रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप टाकळेवाडी येथे बेकायदेशीरपणे घरात घुसून सामाईक दरवाजाला लावलेले कुलूप, कडीकोयंडा आणि वरील बाजूस असलेली कडी हातोडीने तोडून नुकसान केल्याप्रकरणी प्रदीप काशिनाथ साळवी (रा. फणसोप टाकळेवाडी, रत्नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात बाळकृष्ण शिवराम साळवी (६९ रा. फणसोप टाकळेवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कॉंस्टेबल झोरे करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:49 PM 15-Mar-21