फ्लॅटचे कुलूप तोडून अनाधिकाराने आतमध्ये राहणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील फ्लॅटचे कुलूप तोडून त्यात अनाधिकाराने राहिल्याप्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मार्च २०२१ रोजी घडली असून या प्रकरणी शनिवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. नंदकुमार हिरे, निलीमा हिरे, ललित हिरे, हेमचंद्र हिरे (सर्व रा. गोविंद अपार्टमेंट नाचणे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मनीषा वासुदेव लोकेगावकर (४२, रा. बेलापूर, मुंबई) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, या चार संशयितांनी मनीषा लोकेगावकर यांच्या मालकीच्या गोविंद अपार्टमेंटमधील फ्लॅटचे कुलूप तोडून त्यात अनाधिकाराने प्रवेश करत त्यात आपले सामान ठेवून ते राहात आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कांस्टेबल गायकवाड करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here