महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ नवनीत राणांचेही अमित शहांना पत्रं

0

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी या पत्रातून केली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी 8 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची होती. ही कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तिच कार अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यासह सापडली होती. याप्रकरणी हिरेन यांची चौकशीही करण्यात आली होती. ते चौकशीला सहकार्य करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरने यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीही केली होती. मात्र, त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राणा यांनी या पत्रातून दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here