मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून झालेल्या चौकशी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये ही स्फोटकं आढळली होती. तसेच एक इनोव्हा कारही या परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. या इनोव्हा कारमधून पीपीई किट घालून एक व्यक्ती खाली उतरला होता. एनआयए या व्यक्तीचा शोध घेत आहे. ती व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयच्या टीमला आहे. सचिन वाझे यांना पीपीई किट घालून सीसीटीव्ही दिसणाऱ्या व्यक्ती कसा चालतो त्याप्रमाणे तपासलं जाणार आहे. सचिन वाझे हे सध्या 25 मार्चपर्यंत एनआयच्या कोठडीत आहेत. एनआयएच्या मते सचिन वाझे या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. सचिन वाझे हे या सर्व कटाचा छोटासा भाग आहे, असं सूत्रांच्या माहितीतून कळत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 15-Mar-21
