देवरूख : माखजन येथील अॅड. पी. आर. नामजोशी महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या जाधव बंधूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रत्येकी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. दीपेश जाधव याने ५ कि.मी. चालणे प्रकारात प्रथम तर प्रितम जाधव याने अडथळा पार करत १०० मीधावणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. संस्थाध्यक्ष श्रीकांत फाटक, संचालक, मुख्याध्यापक विलास पाटील, पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. स्वरूपा कनगुटकर व प्रा. अभिजित सुर्वे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
