नारायण राणेंचे पत्र केंद्राने कचऱ्याच्या डब्यात फेकले; खा. विनायक राऊत यांचा दावा

0

सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचं पत्रं त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं होतं. राणे यांचं हे पत्रं शहा यांनी केराच्या टोपलीत फेकून दिलं आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रया देताना विनायक राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली. नारायण राणेंना काही कामधंदा उरलेला नाही. भाजपने सुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिले आहे, अशी टीका करतानाच अमित शहा यांनीही त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांचं पत्रं केऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं आहे, असं राऊत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here