देवरूख : रत्नागिरी-देवरूख मार्गावरील पांगरी येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे सध्या ठिकाणी पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पर्यायी पूल हा अरूंद असल्याने एसटीची वाहतूक होताना समस्या निर्माण होतात. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पुलाचे काम तातडीने पूर्णत्वास नेण्याची मागणी या भागातील ग्रामस्थ तसेच प्रवासी जनतेकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:38 PM 15-Mar-21