रत्नागिरीचे कलिंगडही परदेशात

0

रत्नागिरी : हापूस पाठोपाठ आता रत्नागिरीचे कलिंगडही परदेशात निर्यात होऊ लागले आहे. देवरुख, खेड, चिपळुण येथील चार शेतकऱ्यांनी दीडशे टन कलिंगडाची निर्यात दुबईमध्ये केली आहे. कलिंगडालाही परदेशी चलन मिळू लागले असून गिरीश, सिमॉन्स कलिंगडाच्या दोन जातींना परदेशात मोठी मागणी आहे.

गतवर्षी संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कलिंगडाची निर्यात केली होती.त्यानंतर यावर्षी देवरुखमधील सचिन जाधव, श्री बडद, खेड मधील श्री इंदुलकर, तर आंबडसमधील हेमंत कदम यांच्या शेतातील गिरीश आणि सिमॉन्स या जातीच्या कलिंगडाची निर्यात झाली आहे.एबीपी एक्झाटिक पाटण यांच्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीबरोबर निर्याती संदर्भात मार्गदर्शन केले जात असून खत, बियाणांचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात सध्या गिरीश, विशाला, सरस्वती, अनमोल,सिमोन्स विविध जातीच्या कलिंगडाची लागवड करण्यात येत आहे. परंतु यामधील गिरीश आणि सिमॉन्स जातीच्या कलिंगडाला दुबईत मागणी असल्याने या कलिंगडाची निर्यात करण्यात आली आहे.यामुळे शेतकर्यांना चांगला दर मिळत असून आतापर्यंत १५०टन निर्यात करण्यात आली असून पुढील काही दिवसात २५० टन निर्यात केली जाणार आहे. यावर्षी ५०० ते ६०० टन कलिंगडाची निर्यात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून गतवर्षी प्रथमच गिरीश या जातीच्या कलिंगडाची निर्यात दुबईला करण्यात आली होती. कलिंगडावर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रक्षक सापळे लावण्यात आले आहेत. चार किलोच्यावरील कलिंगडाची निर्यात करण्यात येत असून वेडीवाकडी नसावी, कोणत्याहि किडीचा प्रादुर्भाव नसावा अशा अटींची पुर्तता करुन कलिंगडाची निर्यात करण्यात आली आहे.कोणताहि निर्यात खर्च न करता जागेवरच चांगला दर मिळत असल्याने निर्यात करण्यावर शेतकर्यांचा कल आहे. रत्नागिरीतून मुंबई येथे कलिंगड नेवून तेथून दुबईला निर्यात करण्यात येते. शेतकऱ्यांना एबीपी एक्झाॅटिक पाटणचे बळीराम पवार मार्गदर्शन करतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:41 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here