सैतवडे : रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सैतवडे येथील दिमॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीवर मात करत जिल्हास्तरावर मजल मारली आहे. या संघाची कप्तान ऐश्वर्या तांडेल हिने उत्तम कामगिरी बजावली. संघात पूर्वा वासावे, मनिषा पावरी, तन्वी धातकर, नेत्रा जाधव, मानसी पटेकर, पूजा कु?, वेदिका लोकरे, ऋणाली शितप, सलोनी धातकर, कोमल कांबळे, योगीता शितप, आदिती झर्वे, समृद्धी डोर्लेकर, संचिता जाधव, नेहारिका पावस्कर यांचा सहभाग होता. थाळीफेक स्पर्धेत प्राजक्ता वनये हिने प्रथम व कोमल कांबळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अ. शकुर चिलवान, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक विलास कोळेकर यांनी अभिनंदन केले.
