रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची अधिमंडळाची वार्षिक बैठक ऑनलाईन पध्दतीने संपन्न

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, रत्नागिरी या संस्थेची सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठीची अधिमंडळाची वार्षिक बैठक रविवार दि. १४.०३.२०२१ रोजी ऑनलाईन पदतीने “झूम अॅप तसेच यत्या” युट्युबद्वारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. दिलीप गणपत देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठिक १०.०० वाजल्यापासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत घेण्यात आली. सदरील ऑनलाईन पध्दतीच्या सभेचे नियंत्रण महाराष्ट्र सहकारी संघाचे शिक्षणाधिकारी श्री. दिनेश सोनाळेकर यांनी केले. कोविद-१९ या आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्याच्या शासनाच्या परिपत्रकास अनुसरुन अशा प्रकारे ऑनलाईन पध्दतीने संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक बैठक घेण्याची संस्थेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. सर्व संचालक महाशय या समन्वयाने ही सभा नियोजनबध्द पध्दतीने पार पडली. या सभेचे थेट प्रक्षेपण सुमारे ५५०० एवढया व्यक्तींनी पाहीले. तसेच अनेक व्यक्तींनी प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभाग घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ही सभा घेतल्यामुळे सभेला संस्थेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी उपस्थितीची नोंद झाली. या सभेमध्ये मा. राज्यपाल यांच्या आदेशाप्रमाणे सन २०१९-२०२० साठीचे अधिमंडळ वार्षिक बैठकीतील आवश्यक कामकाजास निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापक मंडळाला प्रदान झाल्याने त्या अनुषंगाने झालेल्या सन २०१९-२०२० मधील अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेला खर्च, सन २०२०-२०२१ चे अंदाजपत्रक, मालमत्ता निर्लेखन, सन २०१९-२०२० चा अहवाल, ताळेबंद, नफातोटापत्रकास मान्यता, नफावाटणी, वैधानिक लेखापरिक्षक नियुक्ती, मागील सभेचे प्रतिवृत्त मंजुरी, उपविधी दुरुस्ती मंजुरी, शाखा खेड व लांजा येथील कार्यालयांसाठी स्वतंत्र जागा खरेदी तसेच शाखा चिपळूणसाठी इमारत बांधकाम इत्यादी विषयाना मान्यता देण्यात आली. संस्थेच्या हितासाठी सभासदांनी उपस्थित केलेले मुद्दे, प्रश्न यांना अध्यक्ष श्री. दिलीप ग. देवळेकर यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या सभेच्या आयोजनासाठी संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, संस्थेचा कर्मचारी वर्ग, तंत्रज्ञ तसेच सहकार्य करणारे ज्ञात अज्ञात व्यक्ती यांचे मा. श्री. दिलीप ग. देवळेकर, अध्यक्ष महाशय यांनी आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:19 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here