शांतादुर्गा पिलणकरीन देवस्थानचा आज दिवजोत्सव

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील पिलणकर कुटुंबीयांची कुलदेवी शांतादुर्गा पिलणकरीन देवस्थानचा तेरावा वर्धापनदिन (दिवजा) गोवा राज्यातील डिचोली तालुक्यातील नार्वे, गावकरवाडा येथे मंगळवार, दि. १६ मार्च रोजी साजरा होणार आहे. सकाळी ९ पासून नवचंडी याग विधी, यजमान रोहिदास पिलणकर-मेरशी, गोवा कुटुंबाकडून होणार आहे. देवीची पूजा, कुंकूमार्चन, अभिषेकादी नंतर दुपारी १ वा. महाआरती, महाप्रसाद होईल. दुपारनंतर भजन, संध्या. ७ वा. पालखी प्रदक्षिणा, सुहासिनींचा दिवजोत्सव (पाच ज्योतीचा दिवा) हा मुख्य कार्यक्रम होईल. रात्री आरती, लिलाव झाल्यानंतर नाटयरंग क्रिएशन नारवे आयोजित पुंडलिक नाईक लिखित दोन अंकी नाटक ‘चतुरंग’ सादर होणार आहे. शासनाने दिलेले आरोग्य विषयक सर्व नियम पाळून उत्सव साजरा केला जाईल. पिलणकर बांधवांनी, भाविकांनी दिवजोत्सवास येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे श्री शांतादुर्गा पिलणकर प्रासादिक उत्कर्ष मंडळ, रत्नागिरीतर्फे कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here