निवळी येथील कातळशिल्पाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, कातळशिल्पाच्या बाजूलाच टाकण्यात आले मातीचे ढिगारे

0

रत्नागिरी : कोकणात विविध ठिकाणी असणारी कातळशिल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून आता कातळ शिल्पांचे जतन आणि पर्यटकांच्या दृष्टीने परिसराचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र तालुक्यातील निवळी गणपतीपुळे मार्गावर असणारे कातळशिल्प दुर्लक्षित असल्याचे जाणवत आहे. या कातळशिल्पाच्या बाजूला जमीन मालकाने मातीचे मोठे ढिगारे ओतल्याचे फोटो पुण्यातील पर्यटकांनी सोशल मिडीयावर टाकले आहेत. याची दखल घेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत आपले स्वतःचे कामगार व यंत्रसामग्री लावत टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे बाजूला करून या भागाची स्वच्छता केली आहे. प्रशासन कातळशिल्पांचा ठेवा जपत आहे आणि अशातच या जागामालकालाच या कलाकृतीचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शासनाने अशी कातळशिल्पे ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेत हा ठेवा जतन करून ठेवावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:47 AM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here