शिमगोत्सवात पालखी घरी नेण्याचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

0

रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दि. १० मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशामध्ये बदल केला असून १५ रोजी जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश देताना देवदेवतांच्या पालख्या २५ लोकांच्या उपस्थितीमध्ये घरोघरी नेता येतील, असे म्हटले आहे. यामुळे कोकणातील शिमगोत्सवात आता भाविकांना आपल्या इष्ट देवतेची
घरासमोर भेट होणार आहे.

तसेच चाकरमान्यांनी शिमगोत्सवात गावाकडे येणे टाळावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. अगदीच आवश्यकता असल्यासच गावाकडे यावे. मात्र कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना 72 तास आधी आरटीपीसीआर चाचणी किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. या पार्श्वभूमीवर गावागावात ग्रामकृती दल आणि नागरी कृती दल दक्ष ठेवण्यात आली आहेत. मुंबई, पुणेसह बाहेरून येणाऱ्यांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात प्रत्येकाच्या तापमानाची नोंद घेण्यात येईल. लक्षण नसलेल्या चारकमान्यांनाच शिमगोत्सवात सहभागी होता येईल. एखाद्याला लक्षण आढळल्यास त्याला विलीगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यंदाचा शिमगोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 25 ते 50 जणांच्या उपस्थितीत हा सण साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रसाद वाटप, पालखी नाचवणे टाळावे असेही ते म्हणाले. गावात आलेली मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:01 AM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here