बाटला हाउस चकमक; दहशतवादी आरिझ खानला फाशीची शिक्षा

0

नवी दिल्ली : सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली.

सायंकाळी ४ वाजेपर्यंत न्यायालयाने शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. आरिझ खानला पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती. न्यायालयाने मागील सुनावणीत आरिझ खानला दोषी ठरवले होते. त्याला दिल्ली पोलिसांनी २०१८ मध्ये अटक केली होती. न्यायालयाने आरिझ खानला आर्म्स अॅक्ट आणि कलम ३०२, ३०७ अंतर्गत दोषी ठरवले होते. आरिझ २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणानंतर फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये जीव गमवावा लागलेल्या पोलीस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी आरिझ खानला दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच, पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांना देखील त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here