बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला मंडणगड तालुक्यात प्रतिसाद

0

मंडणगड : आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात बँक कर्मचारी सोमवारपासून १५ मार्च २०२१ दोन दिवसांच्या संपावर आहेत. तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने सोमवारी बँकिंगकरिता शहरात आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. सार्वजनिक क्षेत्रातील आणि जुन्या जमान्यातील १२ बँका, खासगी, सहा विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांचे संपामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली असली, तरी खासगी व सहकारी बँका तसेच पतसंस्थांचे कामकाज दिवसभर सुरळीतपणे सुरू होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here