शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर आली तर…, महाराष्ट्रात फिरता येणार नाही; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

0

मुंबई : सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिला. आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले. नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मंगळवारी पुन्हा पत्रकारपरिषद घेऊन वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केले. तपासयंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. आता वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांनी मागितल्यास मी देईन, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here