रिलायन्स फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘सागरी सुरक्षा’ कार्यक्रम

0

रत्नागिरी : रिलायन्स फाउंडेशनच्या माहिती सेवा विभागाच्या पुढाकाराने भारतीय तटरक्षक दल आणि कर्ला मच्छीमार सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा या विषयी कार्यक्रम करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली ७५ वर्षांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने “भारत का अमृत महोत्सव” हा उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिलायन्स फाउंडेशनने सागरी सुरक्षा या विषयीच्या कार्यक्रमाचे आयोजन कर्ला मच्छीमार सोसायटीमध्ये केले होते. यावेळी तटरक्षक दलाचे कमांडंट डीआयजी के. एल. अरुण उपस्थित होते. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करताना घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती दिली. मासेमार हे तटरक्षक दलाचे मित्र असून मासेमारांना भारतीय तटरक्षक दलाकडून संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तटरक्षक दलाचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख डी. पी. टोमर यांनी लाइफ जॅकेट, लाइफ बोयांचे योग्य उपयोग आणि वापरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मासेमारांनी समुद्रात जाताना बोटीवरील सर्व मासेमारचे ओळखपत्र, बोटीची कागदपत्रे घेऊनच समुद्रात जावे, असे आवाहन त्यांनी केले. तटरक्षक दलाचा आपत्कालीन संपर्क क्रमांक देऊन समुद्रात एखादी अनोळखी किंवा संशयित बोट किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ तटरक्षक दलाला कळवण्याचे आवाहन केले. कर्ला सहकारी मच्छीमार संस्थेचे चेअरमन नदीम सोलकर यांनी भारतीय तटरक्षक दल मासेमारांसाठी समुद्रात किती महत्त्वाचा दुवा आहे, याची माहिती दिली. रिलायन्स फाउंडेशन व तटरक्षक दलाचे मासेमारांसाठी करत असलेल्या कामाबद्दल आभार मानले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी “भारत का अमृत महोत्सव” या उपक्रमाबद्दल तसेच रिलायन्स फाउंडेशन मच्छीमारांसाठी करत असलेल्या कामाची माहिती दिली. रत्नागिरी शहरी पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी मिशन सागरबद्दल माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here