रत्नागिरी जिल्ह्यातील ४० हजार ४२५ शेतकऱ्यांना कर्जमाफी

0

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ४० हजार ४२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांना ८९ कोटी २२ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. याशिवाय ६ हजार ४२५ शेतकरी वेटींग लिस्टवर असून त्यांचे कर्ज देखील लवकरच माफ होणार आहे. अपुऱ्या पावसाने २०१२ ते २०१६ या कालावधीत खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाकडून २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत शासनाने दिनांक १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली त्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. नियमित कजार्ची परतफेड करणाऱ्या एकूण २२ हजार ४२० शेतकऱ्यांना २३ कोटी ८९ लाखांचा प्रोत्साहनपर लाभ दिला. त्यात जिल्हा बँकेच्या १५ हजार ७३७ शेतकऱ्यांना १० कोटी ४ लाख तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकेच्या ६ हजार ६८३ शेतकऱ्यांना १कोटी ३८ लाखांचा लाभ मिळाला. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ४० हजार ७६९ शेतकऱ्यांना ८९ कोटी २२ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या १२ हजार ३०९ शेतकऱ्यांना २३ कोटी ८२ लाख ७८ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांचे मिळून अन्य ५ हजार शेतकऱ्यांना ३ कोटी १७ लाख अशा एकुण जिल्ह्यातील एकूण २७ हजार ३९८ शेतकन्यांना ५५ कोटी ५९ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here