मंडणगड : निर्सग चक्रीवादळानंतर समुद्रातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे यंदाचे कासव महोत्सवाच्या हंगामात वेळास सुमद्रकिनारी कासवांकडून समुद्रकिनारी अंडी सोडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत कासवांनी किनाऱ्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे अंड्यामध्ये घट व समुद्र किनाऱ्यावरून सागरामध्ये जाणाऱ्या पिल्लांचे प्रमाणातही घट झाली होती. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारा हंगाम यंदा दोन महिने उशिरा जानेवारी महिन्यात सुरू झाला. याचा विपरीत परिणामाची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या दोन महिन्यांत समुद्रकिनारी एकूण ३७ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. या घरट्यांमध्ये ३९८४ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 16-Mar-21
