राज्य सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल

0

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर कारमायकल रोड प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक आणि त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आलेले असताना आता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतही अडचणीत आलेले आहेत. याचं कारण आहे भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकीकडे राज्याची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीरपणे राज्य सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं, असा आरोप पाठक यांनी केला आहे. इतकंच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते, मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नसल्याचाही आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:52 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here