ममता बॅनर्जींनी प्रतिज्ञापत्रात 6 गुन्हे लपवले : सुवेंदु अधिकारी

0

कोलकाता : तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 6 फौजदारी गुन्हे लपवल्याचा आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी केलाय.यासंदर्भात सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावरील 6 फौजदारी खटल्यांचा उल्लेख न करता प्रतिज्ञापत्र सादर केले. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे (ईसी) तक्रार दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 6 फौजदारी खटल्यांचा उल्लेख केलेला नाही. यात 2018 मध्ये आसाममधून दाखल झालेल्या 5 एफआयआर आणि एक सीबीआय एफआयआरचा समावेश असल्याचे सुवेंदु अधिकारी यांनी सांगितले. अधिकारी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संदर्भ देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की 5 एफआयआरपैकी एक फेटाळून लावण्यासाठी त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण त्यांची याचिका फेटाळून लावली. अधिकारी यांचे म्हणणे आहे की त्यांनी सर्व पुरावे निवडणूक आयोगाकडे दिले आहेत आणि आयोग या प्रकरणात लक्ष घालेल असा त्यांना विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:12 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here