संगमेश्वर : कुरधुंडा गावचे माजी सरपंच अलीसाहेब अलजी (वय ९२) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सरपंचपदाची धुरा त्यांनी सलग ४७ वर्षे सांभाळली होती. आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात लोकांची सेवा करण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले. कुरधुंडा गावाचे सरपंच म्हणून त्यांनी १९५८ ते २००५ पर्यंत काम पाहिले. या कारकीर्दीत त्यांनी कुरधुंडा गावाच्या विकासाचा पाया रचला आणि विकासाला चालना दिली. गावातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. विविध सोसायट्या, संघटना, इतर सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अलीसाहेब अल्जी यांचे आज सकाळी निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला सर्वधर्मीयांनी गर्दी केली होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 16-Mar-21