”अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी?”

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत महाविकास आघाडी सरकारने काय केले?” असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. तसेच अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार? असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?” असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच “मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते” असं देखील त्यांनी म्हटलं आहे. “खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here