कृषी संशोधन केंद्र कोकणासाठी अत्यंत उपयुक्त

0

रत्नागिरी : शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रावर सुरू असणारे संशोधन कोकणातील बदलत्या वातावरणास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले. कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथे भात व भुईमूग पिकावरील नवीन वाण निर्मितीचे व बीजोत्पादनाचे कार्य सुरु आहे. या संशोधन कार्याची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी दि. 4 रोजी भेट देऊन पाहणी केली. भेटीदरम्यान केंद्रावर सुरू असलेल्या भात व भुईमूग पिक संकरीकरण कार्यक्रमातील तंत्रज्ञान व बारकावे जाणून घेतले व सध्या वापरात असणार्‍या पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल याबद्दल चर्चा केली. केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी केंद्रावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलद गतीने भात जातीची निर्मिती ठरळिव अर्वींरपलशाशपीं ेष ॠशपशीरींळेप (ठॠअ) करण्याचे तंत्रज्ञान भात वाण निर्मितीमध्ये अतिशय फायदेशीर ठरणार याबद्दल माहिती दिली. केंद्राद्वारे विकसित केलेले विविध भात, भुईमूग जाती लागवड तंत्रज्ञान शिफारशी व विविध वाणांच्या बियाणे नमुन्यासहित अद्ययावत करण्यात आलेले पिक संग्रहालय तसेच भात वाण प्रसारणादरम्यान घेण्यात येणार्‍या विविध निरीक्षणाकरीता आवश्यक असलेल्या यंत्रांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळेची पाहणी केली. केंद्राचे वाढते संशोधन व विस्तारकार्याचा प्रसार लक्षात घेता केंद्राला वाढीव तांत्रिक मनुष्यबळ मिळण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी आश्वासन दिले. या प्रसंगी विद्यापीठाचे बियाणे उपसंचालक डॉ. ए. व्ही. माने, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. शिंदे, मत्स्य महाविद्यालय, शिरगांव येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिनगारे तसेच शास्त्रज्ञ डॉ. शिरधनकर, चौधरी, विद्यापीठ बांधकाम शाखेचे सहाय्यक अभियंता धनावडे, पाटील व पावरा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here