राज्यात बैठका सुरुच, महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक

0

मुंबई : राज्यात सध्या अनेक घडामोडी सुरुच आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांचे शर्मा प्रकरण या सगळ्या गोष्टी ताज्या असतानाच अंबानी यांच्या घराबाहेर उभी असलेल्या स्फोटकांच्या गाडीने राजकारणच बदलून गेलं. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आणि राज्यातील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर पुन्हा टीका करण्यात आली. या सगळ्या विषयांवरून गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गृहमंत्री, या सगळ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरुच असताना आज (१७ मार्च) महाविकासआघाडी सरकारची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here