श्री नवलादेवी, श्री पावणादेवी व श्री देव म्हशेश्वर देवस्थानचा यावर्षीचा शिमगोत्सव साधेपणाने होणार साजरा

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा शिमगा उत्सव शासनाचे नियम अटी यांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे सडामि-या ग्रामस्थांनी ठरविले असून त्यानुसार रविवार दि.२८.०३.२०२१ रोजी श्री नवलादेवी, पावनादेवी व म्हशेश्वर या देवतांची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी व श्री जुगाई देवी, सावंत साळूंखे यांचा झाडगांव येथील मूळ चौथरा, राईतील श्री नवलाई पावणाई मंदीर, रत्नागिरी पोलीस स्टेशन आणि श्री देव भैरी यांचे भेटीसाठी व होळी आणणेसाठी सालाबादप्रमाणे रत्नागिरी शहरामध्ये जाणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे पालखी रस्त्याने जाताना कोणाचेही ओटी, उलपे, हार, नारळ, पेढे स्विकारले जाणार नाहीत तसेच ज्या भाविकांना देवीला ओटी, उलपे द्यावयाचे असेल त्यांनी सडामि-या मंदिरामध्ये रंगपचंमीपर्यत पालखी सहाणेवर विराजमान होणार आहे त्यावेळी आणून दयावेत तसेच येताना शासनाने दिलेल्या नियम व अटी यांचे पालन करावे. प्रामुख्याने दर्शनासाठी मंदिरात येणा-या भाविकांनी मास्क परिधान करुन व सोशल डिस्टेंसिंगचे पालन करुन दर्शन घ्यावे, याची सर्व भाविकांनी नोंद घेवून देवस्थान कमिटीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here