आता १३० रुपयांत पहा १५० चॅनेल

0

नवी दिल्ली : वाढलेल्या दरांमुळे डीटीएच सेवा घेणाऱ्या ग्राहकांना फटका बसला आहे. मात्र, आता चॅनेल पॅकेजमध्ये बदल करत ग्राहकांना १३० रुपयांत दीडशे चॅनेल पुरविण्याचा निर्णय ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने (एआयडीसीएफ) घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा’च्या (ट्राय) नियमानुसार, महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागते. यात १०० चॅनेल दिले जातात. मात्र, त्यावरील प्रत्येक चॅनेलसाठी अतिरिक्त पैसे आणि त्यावर सेवाकर आकारण्यात आले. त्यात प्रत्येक चॅनेलचे वेगवेगळे पॅकेज आणि ग्राहकांच्या पसंतीचे चॅनेल मिळून केबलसाठी दरमहा किमान ४०० ते एक हजार रुपयांपर्यंत मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने नवीन पॅकेज जाहीर केले. ग्राहकांना आता केवळ १३० रुपयांमध्ये १५० टीव्ही चॅनेल पहायला मिळणार आहे. एआयडीसीएफने जाहीर केलेल्या या निर्णयाबाबत राज्यातील केबल ऑपरेटर यांची १६ ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे. यावेळी ऑपरेटरशी चर्चा केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here