एका पोलिसामुळे सरकारला फरक पडत नाही : शरद पवार

0

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून API सचिन वाझे यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी प्रचंड आरोप होत आहेत.सचिन वाझे यांना यांसंदर्भात NIA ने अटक करत 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे आणि प्रशासनाने त्यांचे दुसऱ्यांदा निलंबनदेखील केलेलं आहे. या प्रकरणात महाविकासआघाडीवर प्रचंड टिका होत आहे. भाजपकडून केल्या जाणाऱ्या या टिकेला आधी शरद पवारांनी ‘हा स्थानिक प्रश्न आहे’ म्हणत फटकारले होते. त्यानंतर दिल्ली येथील पत्रकार परिषदेतसुद्धा त्यांनी पुन्हा एकदा सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, एका पोलिसामुळे सरकार काही अडचणीत येत नाही. या प्रकरणात जर कोणी अधिकाराचा गैरवापर करत असेल तर आम्ही NIA ला त्यात संपूर्ण पाठिंबा देऊ. तसेच महाविकासआघाडी सरकारचं चांगलं चाललय आणि कुठलेही मतभेद नाहीत, असे म्हणत पवारांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 17-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here