रत्नागिरी : शिमगोत्सवासाठी कंटेन्मेंट झोनमधून कुणी येत असेल तर त्यांनी 72 तास आधी आरटीपीसीआर किंवा ॲंटीजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरून जर येत असाल तर ग्रामकृतीदल गावच्या ठिकाणी आपले स्क्रिनिंग करून तपासणी करतील. तपासणीत जर कोणती लक्षणे आढळल्यास पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. कोणतीही लक्षणे आढळली नाही तर तुम्ही शिमगोत्सवात सहभागी होऊ शकता, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिमगोत्सव साधेपणाने साजरा करा. गर्दी टाळा,प्रसाद वाटप टाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी पालखी नाचवू नका. तसेच जिल्ह्याबाहेरून रत्नागिरीत येणाऱ्या लोकांनी शक्यतो गावी येणे टाळा. गरज असेल तरच गावी या असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. शिमगोत्सवात 25 ते 50 जणांपेक्षा अधिक गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 17-Mar-21