मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंड विरुद्धच्या मागच्या दोन टी20 मॅचमध्ये नाबाद 73 आणि 77 रन काढले आहेत. याचा फायदा त्याला ICC च्या रँकिंगमध्ये झाला आहे. ICC ने या आठवड्याची रँकिंग जारी केली आहे. यामध्ये टी20 रँकिंगमध्ये विराट सहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याला 47 रेटींग पॉईंटचा फायदा झाला असून त्याचे आता 744 पॉईंट्स झाले आहेत. विराट वन-डे रँकिंगमध्ये पहिल्या आणि टेस्टमध्ये सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात टॉप 5 मध्ये असणारा तो एकमेव बॅट्समन आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 17-Mar-21