तालुक्यातील सावर्डे येथे गुरुवारी रात्री खवले मांजर सापडले. तेथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, सर्पमित्र व प्राणीमित्र या सर्वांनी दुर्मिळ खवले मांजराला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. या सर्वांच्या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. सावर्डे येथील पवार सॉ मिलजवळ लाकडाच्या वखारीकडे जाताना खवले मांजर पहारेकरी सीताराम राणे यांच्या निदर्शनास आले. याची माहिती सर्पमित्र व प्राणीमित्र राजेश सावंत यांना दिली. उद्योजक सचिन पाकळे, शिवप्रसाद विचारे, अभिमन्यू विचारे, साजन कुरुसिंगल, दीपक सावर्डेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी खवले मांजराला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले.
