रत्नागिरी : तालुक्यातील चाफे येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी ८.४५ वा.सुमारास करण्यात आली असून यामध्ये ७६० रुपयांची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य जप्त केले. लीलावती लक्ष्मण किंजळे (६२, रा. चाटवळवाडी-चाफे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस नाईक अमिता पाटील यांनी तक्रार दिली होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:13 PM 18-Mar-21