खेड : दिवाळी व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व पर्यटकाच्या सोयीसाठी २२ ऑक्टोबर पासून कोकण रेल्वे मार्गावर बांद्रा मंगलोर ही विशेष गाडी धावणार आहे. यापूर्वीच ३ साप्ताहीक विशेष गाड्यासह डबल डेकर गाडीला चार अतिरीक्त डबे जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केले आहे. २२ ते २९ ऑक्टोबर व २४ ते ३१ डिसेंबर या कालवधीत हि गाडी धावणार आहे. दर मंगळवारी बांद्रा येथून रात्री ११.५५ वा सुटून दुसऱ्या दिवशी सांयकाळी ७.४५ वाजता मंगळूर येथे पोहचणार आहे. परतीच्या प्रवासात २३ ते ३० ऑक्टोबर, २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत धावेल. दर बुधवारी रात्री ११ वाजता मंगलोर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सांयकाळी ७.३० वाजता बांद्रा येथे पोहचेल. गाडीला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, भटकळ , मुकाम्बिका रोड, बेंदूर, कुंदापुरा, उडुपी मुलकी, सुरतकल असे थांबे असणार आहेत. तसेच दादर मडगाव जनशताब्दी एकस्प्रेस २० ऑक्टोबर पर्यंत व्हिस्टा डोम कोचच्या जागी एसी कोच ट्रेन धावणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी ही गाडी धावणार आहे.
