सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ हजार कोविड लस विनावापर पडून : आ. नितेश राणे

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजारपैकी केवळ १४ हजार लसीकरण झाले असून बाकी २६ हजार कोव्हीड लस विनावापर पडून आल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणेंचा यांनी आज कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा आहे असे पंतप्रधानांकडे रडगाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गायले. राज्याला मिळालेल्या ५३ लाख लसिंपैकी फक्त २३ लाख लसीकरण झाले असून उर्वरित ३० लाख लसीकरण केव्हा करणार ? सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे. संसदेत शिवसनेचा गटनेता असलेले खासदार विनायक राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत ? पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार असा सडेतोड सवाल आमदार नितेश राणेंनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 18-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here