मुंबई विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळावर डॉ. राजीव सप्रे यांची निवड

0

रत्नागिरी : येथील गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ.राजीव सप्रे यांची मुंबई विद्यापीठाच्या गणित अभ्यासमंडळावर नुकतीच निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या गणित विभागात ३४ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य पदाचा त्यांनी दोनवेळा कार्यभार सांभाळला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सभासद असून बारटके इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणून ते काम पाहतात. त्यांनी २० शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांनी बारा पुरस्कारप्राप्त शोध प्रकल्पांना मार्गदर्शन केले आहे. गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाद्वारे प्रतिवर्षी राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा- उपयोजित गणित अशी घेतली जाते. या त्यांच्या कार्याचा आढावा घेत मुंबई विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळावर थेट कुलगुरूंकडून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. या नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. सप्रे यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here