दापोली : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव लोणेरे येथे दापोलीतील प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दापोली तालुक्यातील बुरोंडी कोळथरे परिसरातील प्रवासी घेऊन जाणाऱ्या आराम बसला अपघात झाला. यामध्ये कृष्णा बैकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवाह कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, उर्वरित प्रवाशांची नावे उशिरापर्यंत कळू शकली नाहीत. या आराम बसमध्ये एकूण ३७ प्रवासी होते. अपघातात समीर गोवले (२९. गोवलेवाडी कोळथरे), जगदीश दत्ताराम गोवले (२६,गोवलेवाडीकोळथरे, अंजली अरविंद शिगवण (५५), दत्ताराम रेमजे (४५, गोमराई),प्रीती पांडुरंग रेमजे (४५), कृष्णा बैकर (५०,आडीवाडी बोरिवली), प्रियांका बैकर (४५, आडीवाडी बोरीवली) हे जखमी झाले आहेत.
