निवळी येथून चोरीला गेलेला डंपर सापडला बेळगावात

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी नजिकच्या पेट्रोल पंपातून लांबविण्यात आलेला सुमारे १५ लाख रु.किंमतीचा डंपर ग्रामीण पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विशाल पास्ते रा.कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी ते बेळगाव मार्गावरील प्रत्येक पेट्रोल पंपातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलीसांनी बेळगाव जिल्ह्यातील चिक्क बागेवाडी येथून हा डंपर ताब्यात घेतला आहे. बेळगांव जिल्ह्यात डंपर चोरी करणारी मोठी टोळी कार्यरत असून या प्रकरणी अन्य दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ट्रक, डंपर चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:35 AM 19-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here