रत्नागिरी : पीडित महिलांसाठी त्यांच्या पुर्नवसनासाठी त्यांचे चांगल्या उपचाराबरोबरच समुपदेशन व्हावे याहेतूने केंद्र शासनाकडून वन स्टॉप सेंटर ची संकल्पना पुढे आली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात या सेंटरची अंमलबजावणी झाली. रत्नागिरीत देखील या सेंटरचे शासकीय रूग्णालयात उद्घाटन करण्यात आले. मात्र सहा महिने उलटून गेले तरी अद्यापही याठिकाणी कामकाज सुरू झाले नाही. केवळ कार्यवाही म्हणून उद्घाटन कार्यकम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उरकण्यात आला होता. यासाठी स्वतंत्र जागा मिळत नसल्याने जिल्हा महिला बालविकास विभागासमोर अंमलबजावणी प्रश्न उपस्थित राहिला आहे.
वर्षभरापूर्वी पालकमंत्री रविंद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सीईओ आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय रूग्णालयात वन स्टॉप सेंटर चा उद्घाटन साम्रंभ पार पडला. वन स्टॉप सेंटर हे शासकीय रूग्णालयापासून 3 किमीच्या आत असावे ही तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे 3 किमीच्या आत कुठे सेंटर सुरू करायचा हा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमोरही पश्न उभा टाकला होता. मात्र जिल्हा शासकीय रूग्णालयाने त्यावेळी सहकार्य दर्शवल्याने रूग्णालयाच्या इमारतीत सेंटरला दोन रूम देण्यात आल्या. उद्घाटनाचा कार्यक्रम देखील पार पडला. हे सेंटर एका खाजगी संस्थेला चालवण्यास द्यावयाचे होते यासाठी टेंडर काढण्यात येणार होते मात्र यातील कोणतीही पकिया पूर्ण न झाल्याने वर्ष उलटून गेली तरी वन स्टॉप सेंटरची अंमलबजावणी अद्यापही रत्नागिरीत होवू शकली नाही. कोकणातील पहिले वन स्टॉप सेंटर म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आले होते.
मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न घातल्याने केवळ कागदवरच वन स्टॉप सेंटरची प्रक्रिया दिसून येत आहे. सध्या फोक्सो च्या घटनांमध्ये व महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत देखील वाढ होत आहे. ही वस्तूस्थिती असताना या पीडितांना भक्कम पाठबळ, समुपदेशन देण्याची गरज आहे. पीडितांना या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठीच वन स्टॉप सेंटर ही संकल्पना केंद्र शासनाने पुढे आणली आहे. या संदर्भात एक कमिटी नेमण्यात आली आहे. स्वतंत्र असे सेंटरची कार्यपणाली सुरू न झाल्याने पीडितेने कुठे जायचे ? हे सेंटर रत्नागिरीत आहे का? असा पश्न आता रत्नागिरीकरांना पडला आहे.
