राजकीय घडामोडींना वेग, गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीला

0

नवी दिल्ली : मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तृळात प्रचंड गोंधळ झाला आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांचीसुद्धा बदली करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ झाल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (१९ मार्च) भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 19-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here