लांजा (राहुल वर्दे) : शासनाचा अध्यादेश असतानाही विधानसभा २०१९ निवडणूच्या कामासाठी गरोदर, स्तनदा मातांना आदेश काढण्यात आले आहेत. विधानसभा २०१९ निवडणुक कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती परिपूर्ण न घेता हे आदेश काढण्यात आले आहेत. कोणतीही माहिती कर्मचाऱ्यांनी न भरता ही माहिती तालुक्यातील कार्यालयातुन पाठवण्यात आली. यात गरोदर, स्तनदा मातांना निवडणूक कर्मचारी नियुक्ती आदेश आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या आदेशांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असे आदेश दिल्याने एक प्रकारचा दबाव निर्माण झाला आहे. रत्नागिरी खबरदारने याब्त बातमी प्रसिद्ध केल्यावर गरोदर, स्तनदा मातांना आदेश रद्द करण्यासाठी प्रशिक्षण स्थळी अर्ज घेऊन बोलविण्यात आले.
नुकतेच नवनियुक्त शिक्षण सेवक यांची कोणतीही संपूर्ण माहिती न घेता परस्पर याद्या दिल्याने गोंधळ उडाला होता. माहिती न घेता आदेश कसे काय आले या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी खबरदार ने आवाज उठवल्यावर या महिलांचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. याबद्दल रत्नागिरी खबरदारचे विशेष आभार मानले जात आहेत सर्व महिला राजापूर येथे स्वतः जाऊन अर्ज दिल्यावर आदेश रद्द करण्यात आले. भविष्यात कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहितीची छाननी करूनच निवडणुकीसाठी आदेश काढावेत अशी मागणी होत आहे.
