कोव्हीडग्रस्त आर्थिक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे वर्धिष्णू अर्थकारण, शिस्त आणि नियोजन याचा परिणाम : ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : सन २०२०-२०२१ हे संपूर्ण आर्थिक वर्ष कोव्हीड-१९ ने ग्रासलेले आर्थिक वर्ष होते. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रत व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान स्वामी स्वरूपानंदने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत स्वरूपानंदने याहीवर्षी वर्धिष्णू व्यवहार केले. संस्थेचा आर्थिक आढावा वर्षअखेरी पूर्वी सादर करताना मनस्वी आनंद होतो. कठीण कालखंडातही सर्व सभासद, ग्राहक वर्ग, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी या सर्वांनी उत्तम साथ संचालक मंडळाला दिली. व्यवस्थापक मंडळाने आखलेली धोरणे, घेतलेले निर्णय, राबवलेले उपक्रम या सर्वांचे उत्तम कार्यान्वयन झाले. कर्जदार, सभासदांनी कठीण कालखंडातही संस्थेची वसुली नियमित भरण्याचा कटाक्ष ठेवला. ठेवीदारांनी विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवल्या. या सर्वांमुळे कोव्हीडच्या कठीण कालखंडातही संस्थेचा आर्थिक आढावा रोचक होत आहे. गतवर्षी संस्थेचे फंड आणि रिझर्व हे २१ कोटी ८३ लाख होते. त्यामध्ये ०३ कोटी ४४ लाखांची म्हणजे १५ टक्के वाढ झाली. संस्थेकडील ठेवी गतवर्षी २०१ कोटी होत्या. त्या ठेवींमध्ये २२ कोटींची वाढ होऊन ठेवी २२३ कोटी झाल्या आहेत. संस्थेच्या येणे कर्जातही लक्षणीय वाढ झाली असून, गतवर्षी १४१ कोटींचे कर्ज येणे होते ते वाढून यावर्षी १५६ कोटीचे कर्ज येणे दिसत असून, येणे कर्जात १५ कोटींची वाढ झाली असून, वसुलीचे प्रमाण ९९ टक्के राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. संस्थेच्या बँक गुंतवणुकीतही वाढ झाली असून, संस्थेची गुंतवणूक गतवर्षी ८५ कोटी ७० लाख होती. ती वाढून या वर्षी १०१ कोटींची गुंतवणूक झाली असून, १६ कोटींची गुंतवणूक वाढली आहे. संस्थेची मालमत्ता ०४ कोटींचा टप्पा पार करून पुढे गेली आहे. कोव्हीडच्या या कालखंडात संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले. लॉकडाऊन कालावधीतही गरज ओळखून संस्थेने योजना राबवल्या. संस्थेच्या सर्व १७ शाखांच्या माध्यमातून उत्तम अर्थकारण करण्यात यश आल्याने कोव्हीडग्रासित या वर्षातही संस्थेचे व्यवहार वर्धिष्णू राहिले, अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:59 PM 19-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here