ब्रेकिंग : लोटेतील घराडा कंपनीत स्फोट, तिघांचा मृत्यू

0

🔳 कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याने काही कर्मचारी कंपनीतच अडकले असल्याची व्यक्त करण्यात येत आहे भीती

रत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीत सकाळच्या सुमाराच स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग सुद्धा लागली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात कंपनीतील काही कर्मचारी जखमी झाले असून तिघांचा मत्यू झाला आहे. तर जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये. कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याने काही कर्मचारी कंपनीतच अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता घरडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:24 AM 20/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here