मुंबई : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता वाझे प्रकरणात उडी घेतली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडेलल्या स्फोटकांवरुन राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “व्यवहार माझे, जबाबदार वाझे!, सांगा पाहू कोणकोणास म्हणाले”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीसांच्या ट्विटवरुन आता अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबत त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत सोशल मीडियात चर्चा केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 20/Mar/2021