जिल्ह्याला पाणीटंचाईच्या कामासाठी मिळणारा निधी तोकडा

0

रत्नागिरी : गतवर्षी जिल्ह्याच्या पाणीटंचाई आराखड्यात नळपाणी योजना दुरुस्तीसाठी सर्वाधिक अकरा कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली गेली होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यातील नऊ कोटी रुपयांचे कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत दोन कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले असून सात कोटीची मागणी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यावासीयांना दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून पाणीटंचाई आराखडा तयार केला जातो. परतीचा पाऊस न झाल्यामुळे गतवर्षी भीषण टंचाईचे संकेत आधीच मिळाले होते. त्यानुसार मार्च, एप्रिल व मे या तिन महिन्यात परिस्थिती उद्भवली. जिल्हा परिषदेने १४ कोटी रुपयांचा विक्रमी आराखडा तयार केला होता. त्यात नळपाणी योजना दुरुस्तीवर अधिक भर दिला. त्याबरोबर नवीन विंधन विहिरी उभारणे, टँकर व विहिर अधिग्रहण यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. पाणी योजना दुरुस्तीसाठी अकरा कोटी रुपये ठेवण्यात आले. त्यातून सुमारे शंभरहून अधिक कामे हाती घेण्यात आली होती; परंतु निविदांना न मिळालेला प्रतिसाद, योजना राबविलेल्या जागांवर कामे करण्यास न मिळाल्याने सुमारे दोन कोटी रुपयांची कामे करता आली नाहीत. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणी योजना दुरुस्तीची सुमारे नऊ कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. टंचाई आराखड्यातील दोन कोटी रुपये जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झाले होते. त्यातून काही ठेकेदारांची बिले दिली गेली; मात्र सात कोटी रुपये अजूनही शासनाकडून येणे आहेत.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here