रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांची ४८ कोटी ५५ लाखांची विक्रमी थकबाकी

0

🔳 एकट्या रत्नागिरी शहर उपविभागात साडेसात कोटींची थकबाकी; जिल्ह्यात एकूण १ कोटी २२ लाख ग्राहकांचा महावितरणला ठेंगा

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांनी केलेला भरमसाठ वीज वापार व त्यानंतर आलेली वीजबिले अद्यापही अनेकांनी न भरल्याचे चित्र आहे. या थकबाकीने मार्च महिन्यातील विक्रमी थकबाकीची नोंद केली असल्याने आता महावितरण कर्मचार्यांसमोर वसुलीचे मोठे उद्दिष्ट आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. रत्नागिरी खबरदार ला मिळालेल्या आकडेवारीनुसार एकट्या रत्नागिरी शहर उपविभागात ११५६२ ग्राहक थकीत असून यांच्याकडून ७ कोटी ४९ लाख रुपये थकबाकी आहे. जिल्ह्यातील थकबाकीचा आकडा प्रचंड असून जिल्ह्यातील ९८९७२ घरगुती ग्राहकांनकडून २० कोटी ४० लाख रुपये, ९९३९ वाणिज्य ग्राहकांची ८ कोटी १९ लाख थकबाकी, १३२५ औद्योगिक ग्राहकांची ५ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी असून उच्चदाब व पाणीपुरवठा योजना इत्यादी मिळून तब्बल १२२५६४ ग्राहक थकबाकीदार झाले आहेत आणि सुमारे ४८ कोटी ५५ लाख एवढी विक्रमी वीज बिलाची थकबाकी इतिहासात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:26 PM 20/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here