भारतीय हवाई दलाचा आज वर्धापनदिन

0

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचा  आज (८ ऑक्‍टोबर ) वर्धापनदिन आहे. १९३२ मध्‍ये ८७ वर्षापूर्वी  आजच्‍या दिवशी भारतीय हवाई दलाची स्‍थापना झाली होती. भारतीय हवाई दलाचा  स्थापना दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त  गाझियाबाद येथील हवाई दलाच्या तळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये हवाई दलाच्या वैमानिकांकडून थरारक हवाई प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने केलेला हल्ला परतवून लावणारे विंग कमांडर अभिनंदन व पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई दलाच्या वैमानिकांनी सहभाग घेत हवाई कसरती करून दाखवल्या. विंग कमांडर अभिनंदन यांनी आज हवाई दलाच्या विमानांच्या संचलनात मिग 21 विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अभिनंदन यांच्या नेतृत्वाखालील विमानांच्या तुकडीने हिंडन हवाई तळावरून फ्लाय पास केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. यावेळी नवनियुक्त हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया, लष्करप्रमुख बीपीन रावत आणि हवाई दलाचा मानद ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर हेसुद्धा उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here