रत्नागिरी : शहरातील राधाकृष्ण नाका येथील बेर्डे स्टोअर्स चे मालक व रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. भाई बेर्डे हे समाजवादी नेते मधू दंडवते यांचे जवळचे सहकारी होते. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. काही वर्षे ते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देखील होते. अनेक सामाजिक लढायांमध्ये नेतृत्व करणारे समाजवादी विचारसरणीचे जेष्ठ व्यक्तिमत्त्व आज हरपल्याने अतीव दुःख व्यक्त करण्यात येत आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:45 PM 22-Mar-21