जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे कोरोना लसीचे 16 हजार डोस उपलब्ध

0

रत्नागिरी : शिमगोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 41 हजार 365 लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 16 हजार 200 डोस उपलब्ध आहेत. आज सोमवारी आणखी काही डोस मिळणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाख इतकी आहे. त्यातील कोमोर्बिड रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून केलेल्या सर्व्हेक्षणातून ही माहीती पुढे आली. गंभीर व्याधींनी ग्रस्त रुग्णांना कोरोना लवकर होतो. त्यांची तब्बेतही गंभीर होते. अशा लोकांवर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना लसीकरणातही या लोकांचा प्राधान्याने विचार सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात आली. जिल्ह्यात 13 जानेवारील कोवीशिल्ड लसीचे 16 हजार 330 डोस प्राप्त झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोल्हापूर येथून लस पाठविली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 59 हजार 130 डोस कोवीशिल्डचे तर 9 हजार 800 डोस कोव्हॅक्सीनचे देण्यात आले. त्यातील 41 हजार 365 लोकांना लस देण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यात 61 विविध केंद्र सुरु केलेली आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीचे डोस महाराष्ट्रात कमी पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही तशीच परिस्थिती उद्भवू शकते. 92 हजाराहून अधिक लोकांनी अ‍ॅपवर नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 40 टक्के लोकांनी लस घेतली आहे. पहिल्या दोन टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि महसूल विभागातील लोकांना लसीकरणासाठी घेण्यात आले. त्यांचा प्रतिसाद कमी मिळाला होता; परंतु प्रौढ, कोमॉर्बीड लोक लसीकरणाला पुढे येत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 22-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here