सौदी अरेबियात अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी

0

सौदी अरेबियाने अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, एकटी स्त्रीदेखील हॉटेलमध्ये रुम बुक करून एकटी राहू शकणार आहे. यापूर्वी सौदीतल्या नियमांनुसार जोडप्यांना ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागायचा.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

सरकारने नुकतीच नवीन व्हिजा नियमांची घोषणा केली आहे. यापैकीच या काही महत्त्वाच्या घोषणा आहे. सौदीमध्ये पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पूर्वीचे नियम शिथिल करण्यात आल्याचं मानलं जात आहे.

दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर एकट्या महिलांना हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here