प्रचाराचा पोस्टर पडून तरुणीचा मृत्यू; माजी आमदार म्हणतो वाऱ्याला अटक करा

0

चेन्नई | अनधिकृतपणे उभारलेले राजकीय पक्षाचे पोस्टर पडून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, अपघातासाठी वाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी अजब मागणी तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार सी पोन्नईया यांनी केली आहे.

HTML tutorial

24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर सुभश्री हिचा राजकीय पक्षाचे पोस्टर अंगावर पडून मृत्यू झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना सी पोन्नईया यांनी असंवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. या अपघातासाठी पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सुभश्री 12 सप्टेंबरला हेल्मेट घालून दुचाकीवरुन जात होती. यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललीता आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांचे फोटो असलेले पोस्टर तिच्या अंगावर पडले होते.

सुभश्रीच्या मृत्यूनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले होते. या प्रकरणी दोषी असलेल्या अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here